ठाणे, 18 ऑगस्ट : बहुचर्चित, विवादीत ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 30 वी ''ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मात्र, या मॅरेथॉन मार्गामुळे ठाण्यातील हरिनिवास सर्कल इथं मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यामुळं त्रस्त झालेल्या ठाणेकरांनी वाहतूक पोलिसांशी वाद घातला. जवळपास 40 मिनिटे लाल बहादूर शास्त्री मार्गावरील वाहतूक थांबून ठेवण्यात आल्याने वाहतूक चालक थेट स्पर्धकांच्या मधून गाड्या चालवत जाताना पाहायला मिळालं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours