◆शेकडो झाडाचे वृक्षारोपण◆
चिचाळ- ३३कोटि वृक्ष लागवड मोहिमे अंतर्गत जिल्हा परिषद हायस्कूल व ज्युनिअर काँलेज प्राचार्य हरिचंद्र गिऱ्हेपुंजे यांचे अध्यक्षतेखाली वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ग्यानचंद जांभुळकर, शाळा समिती सदस्य प्रकाश हातेल, प्रा. समाधान बोरसे,हिरालाल शहारे,कुमारी मंजुषा लोंदासे, श्रीकांत खंडाईत,कुमारी मनिषा सावरबांधे, कुमारी कल्पना करंजेकर, कुमारी तृप्ती शिंदे, निखिल किरनाके, मधु जांभुळकर, मंदा चाचेरे, व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
       पर्यावरणाचा बिघडलेला समतोल राखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार तर्फे वृक्षारोपण मोहीम राबविली जात आहे. सरकारच्या उपक्रमात सहभागी होत . जिल्हा परिषद हायस्कूल चिचाळ येथे शेकडो झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षाचे संवर्धन करण्यासाठी एक झाड, एक मुल हि संकल्पना राबवली आहे. संचालन व आभार प्रा. समाधान बोरसे यांनी केले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours