रीपोटर . संदीप क्षिरसागर लाखनी
न्यायासाठी, जीव वाचविण्यासाठी पोलिसांचे दार ठोठावणारे अनेक जण पाहिले असतील. मात्र आज लाखनी येथील पोलिस ठाण्यात आलेला अनुभव काही वेगळाच होता. कुत्र्यांच्या झुंडशाहीत सापडल्याने जीव धोक्यात आलेल्या एका हरिणाने चक्क लाखनीचे पोलिस ठाणे गाठले आणि पोलिसांची मदत घेतली. भेदारलेल्या या हरिणीला पोलिसांनी कुत्र्यांच्या तावडीतून सोडवित जीवनदान दिले अन् वनविभागाच्या स्वाधीन केले.
कधी कुणावर पोलिसांची मदत घेण्याची वेळ येईल, याचा नेम नाही. याचाच प्रत्यय आज आला. आठ ते दहा गावठी कुत्र्यांच्या झुंडीत हरिण सापडले. गावाच्या वेशीवर या कुत्र्यांनी हरिणीला आपलं शिकार बनविण्याचा प्रयत्न केला. कुत्र्यांच्या तावडीतून जीव वाचविण्यासाठी हरिण इकडे तिकडे पळत असताना तीने थेट पोलिस ठाण्याचा आवार गाठला. हरिण पोलिस ठाण्यात आल्याचे पाहून तेथील कर्मचारी काळी काळ अवाक् झाले. परंतु कुत्रे पाठलाग करीत असल्याचे लक्षात येताच त्यांनी कुत्र्यांच्या त्या झुंडशाहीला पिटाळून लावले. त्यामुळे हरिणीची त्यांच्यापासून सुटका होऊन तिचे प्राण वाचले. प्रचंड धास्तावलेल्या हरिणीला कर्मचा-यांनी आश्वस्त केल्यानंतर वनविभागाच्या अधिकायांना पोलिस निरिक्षक दामदेव मंडलवार यांनी संपर्क करुन माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी मेश्राम व त्यांच्या सहकाèयांच्या स्वाधीन हरिणीला करण्यात आले. पोलिस निरिक्षक मंडलवार यांच्यासोबत नरेंद्र मुरकूटे, गौरीशंकर कढव, उमेश शिवणकर, प्रमोद टेकाम, धनराज भालेराव, सुनील सरजारे, नितीन झंझाड, वर्षा खोब्रागडे यांनी हरिणीला जीवनदान देण्यासाठी धापवळ केली
Post A Comment:
0 comments so far,add yours