मुंबई, 27 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा सक्रीय राजकारणात प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे. संजय दत्त 25 ऑगस्टला राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करणार होते, असा दावा रासपाचे प्रमुख आणि मंत्री महादेव जानकर यांनी केला. यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महादेव जानकर यांना सामना संपादकीयमधून टोला हाणला आहे. 'सिनेमावाले येऊन धनगरांना काय मिळणार? संजय दत्त हे जानकरांच्या पक्षात प्रवेश करणार असतील तर शाहरुख खान, अक्षय कुमार हे रामदास आठवले यांच्या पक्षात प्रवेश करतील आणि सलमान खान वगैरे मंडळी आंबेडकर-ओवेसींच्या वंचित आघाडीत प्रवेश करण्यासाठी अर्ज देतील. सगळाच विनोद आहे', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी जानकरांना खोचक टोला हाणला आहे.
काय आहे आजचे सामना संपादकीय?
- राष्ट्रीय समाज पार्टीचे अध्यक्ष नामदार महादेव जानकर यांनी आता सांगितले आहे की, अभिनेता संजय दत्त हे पुढील महिन्यात ‘रासपा’त प्रवेश करणार आहेत. इतकेच नव्हे तर दत्त महाशय हे जानकर पक्षाचा जोरदार प्रचारही करणार आहेत.
- ‘संजय दत्त प्रवेश करणार’ या जानकरी दाव्याने मात्र करमणूक झाली आहे. मेळावा धनगर समाजाचा होता व धनगरांच्या अनेक रखडलेल्या प्रश्नांना वाचा फुटेल असे वाटले होते, पण मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली.


- महाराष्ट्रातील धनगर समाजातील अस्वस्थता यानिमित्ताने दिसून आली. सरकारने धनगर बांधवांसाठी अनेक योजना जाहीर गेल्या, त्या आजही कागदावरच आहेत. धनगर समाजाला मेंढी-पालनासाठी जागा आणि जागा खरेदीसाठी 70 कोटी अनुदानाची घोषणा केली. नवी मुंबई, पुणे, संभाजीनगर, नाशिक, नागपूर, अमरावती येथे धनगर विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे बांधण्याची योजना जाहीर केली व त्यासाठी दीडशे कोटी रुपयांची तरतूद केली. त्यातील किती वसतिगृहांचे कार्य सुरू झाले?
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours