मुंबई, 03 ऑगस्ट : मुंबई उपनगरांमध्ये शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच आज मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच, मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरजवळ दरड कोसळल्यानं या महामार्गाची वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरात सायन, कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुल, साकिनाका, अंधेरी, पवई, विद्याविहार, घाटकोपर, कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड, पवई, विलेपार्ले, जोगेश्वरी, मालाड परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तसेच, आज भरतीची वेळ 1 वाजण्याच्या सुमारास आहे आणि 4.87 मीटरची भरती असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं पाऊस आणि भरती हे समीकरण असेल्यामुळं पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post A Comment:
0 comments so far,add yours