मुंबई, 03 ऑगस्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दरम्यान धुळे आणि जळगावमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. यातील अनेकांनी गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये चिंता वाढत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बुधवारी (31 जुलै) भाजपमध्ये मेगाभरती झाली. राष्ट्रवादी-काँग्रेस आणि काँग्रेसमधून आमदार, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं भाजपचं कमळ हाती घेतलं होतं. राष्ट्रवादीचे शिवेंद्रसिंहराजे भोसले, संदीप नाईक, मधुकर पिचड, त्यांचे पुत्र वैभव पिचड, काँग्रेसचे कालीदास कोळंबकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील गरवारे क्लब येथे हा भाजपप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. 'भाजप'वासी होण्यासाठी या सर्व आमदारांनी मंगळवारी (30 जुलै) विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. शिवेंद्रसिंहराजे साता-यातील जावळीचे, पिचड अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, कोळंबकर मुंबईतील वडाळा तसेच नाईक हे नवी मुंबईतील बेलापूरचे आमदार होते. एवढ्या मोठ्या संख्येनं आज भाजपमध्ये मेगाभरती झाल्यानं ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडल्याचं दिसत आहे.
ऑगस्ट महिन्यातील 8 तारखेला भाजपमध्ये काँग्रेसमधील शिरपूर येथून माजी राज्यमंत्री अमरीश पटेल, अक्कलकुवाचे आमदार के सी पाडवी, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील तर जळगाव मधून राष्ट्रवादीचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, धुळ्याचे माजी आमदार राज वर्धन कदमबांडे हे भाजपात प्रवेश घेणार असल्याचं बोललं जातं आहे. या नेत्यांनी गेल्याच आठवड्यात गिरीश महाजन यांची भेट घेतली. तर जयकुमार रावल हे अमरीश पटेल यांच्या संपर्कात आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बुधवारी (31 जुलै) भाजपमध्ये मेगाभरती झाली. राष्ट्रवादी-काँग्रेस आणि काँग्रेसमधून आमदार, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं भाजपचं कमळ हाती घेतलं होतं. राष्ट्रवादीचे शिवेंद्रसिंहराजे भोसले, संदीप नाईक, मधुकर पिचड, त्यांचे पुत्र वैभव पिचड, काँग्रेसचे कालीदास कोळंबकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईतील गरवारे क्लब येथे हा भाजपप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला होता.
'भाजप'वासी होण्यासाठी या सर्व आमदारांनी मंगळवारी (30 जुलै) विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला होता. शिवेंद्रसिंहराजे साता-यातील जावळीचे, पिचड अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, कोळंबकर मुंबईतील वडाळा तसेच नाईक हे नवी मुंबईतील बेलापूरचे आमदार होते. एवढ्या मोठ्या संख्येनं आज भाजपमध्ये मेगाभरती झाल्यानं ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडल्याचं दिसत आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीआधी राज्यात अनेक नेत्यांचा सत्ताधाऱ्यांकडे ओढा सुरू झाला आहे. यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटात निराशेचं वातावरण आहे. अशातच आता भाजपमध्ये पुन्हा एकदा मेगाभरती होणार असून 10 ऑगस्टला काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते हाती कमळ घेणार असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या महाजनादेश यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच  पहिल्या टप्प्यानंतर 10 ऑगस्टला  भाजपमध्ये आणखी काही नेते पक्षप्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आघाडीला मात्र चांगलाच धक्का बसणार आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours