मुंबई  : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. कोहिनूर मिल प्रकरणात ही नोटीस बजावण्यात आली आहे. 22 ऑगस्टला चौकशीला हजर राहण्यास राज ठाकरे यांना सांगण्यात आलंय. राज यांना अशा प्रकारची नोटीस बजावली जाऊ शकते अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मनसे अशा नोटीशींना भीक घालत नाही. सरकार आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलाय.
देशपांडे म्हणाले, कोहिनूर मिलचं प्रकरण अतिशय जुनं आहे. एवढी वर्ष झाल्यानंतर सरकारला आत्ताच जाग का आली असा सवाल त्यांनी केला. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीच्या काळात जोरदार आवाज उठवला होता. त्यामुळेच त्यांना ही नोटीस बजावण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ईडीच्या निशाण्यावर असल्याच्या बातम्या येत होत्या त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना 2 ऑगस्टला पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर त्यांनी ईडीबाबत प्रतिक्रिया दिली होती. 'मला कोणीही हॅलो करण्यासाठी आलेलं नाही. मी या सगळ्याबद्दल फक्त तुमच्याकडून बातम्या ऐकत आहे,' अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली होती.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours