मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची चौकशी करणाऱ्या EDलाच 'मनसे'ने आता नोटीस पाठवलीय. ईडीच्या कार्यालयावर असलेले फलक हे हिंदी आणि इंग्रजीत आहेत. ते मराठीत असायला पाहिजे असं म्हणत 'मनसे'ने जिल्हाधिकाऱ्यांकडे याची तक्रार केलीय. महाराष्ट्रात असलेल्या सरकारी कार्यालयांवरचे फलक हे मराठीतच पाहिजे असा नियम आहे. त्यामुळे 'मनसे'ने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करत त्याची प्रत ईडीला पाठवलीय. आता राज्याच्या मराठी भाषा विभागाने त्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी 'मनसे'ने केलीय.
'मनसे'ने याआधीही मराठी फलकांसाठी मुंबईत जोरदार आंदोलन केलं होतं. हे आंदोलन खास 'मनसे' स्टाईल झाल्याने अनेक दुकानं आणि आस्थापनांच्या पाट्या बदलल्या होत्या. ईडी सरकारच्या निर्देशानुसार कारवाई करत असल्याचा आरोप मनसेने केला होता. त्या पार्श्वभूमीवर जाणीवपूर्वक 'मनसे'ने ईडी विरोधात ही तक्रार दिली आहे.
अशी झाली होती चौकशी
तब्बल पावणे नऊ तासांच्या चौकशीनंतर राज ठाकरे गुरुवारी रात्री 8 वाजून 16 मिनिटांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर पडले.  राज ठाकरे यांनी चौकशीसाठी ईडीला पूर्ण सहकार्य केल्याचं सूत्रांनी सांगितलं.  राज ठाकरेंना पुन्हा चौकशीला बोलावण्यात येणार नसल्याचं समजतंय. गरज पडल्यास चार दिवसांनंतर पुन्हा चौकशीला बोलावणं जाऊ शकतं. दरम्यान, ईडीच्या कार्यालयाबाहेर संध्याकाळी मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. राज ठाकरेंचे कुटुंबीयसुद्धा त्यांच्या बाहेर येण्याची वाट पाहत त्याठिकाणी हजर होते. ईडीच्या कार्यालयाबाहेर आल्यानंतर राज ठाकरे कुटुंबीयांसोबत कृष्णकुंकडे रवाना झाले. कृष्णकुंजवर आल्यानंतर त्यांनी आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त केली. अशा नोटीसा देऊन माझं तोंड बंद करण्याचा कुणी प्रयत्न केल्यास तोंड बंद होणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours