बीड, 24 ऑगस्ट : विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शिवस्वराज्य यात्रेच्या दुसरा टप्प्यातील पाथरी येथील भव्य सभेला शुक्रवारी (23 ऑगस्ट)संबोधित केले. यावेळेस त्यांनी जनतेला भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला. 'आगामी विधानसभा निवडणूक माझ्यासाठी जीवन मरणाची आहे. प्रामाणिकपणानी गेल्या 24 वर्षांपासून तुमची अविरत सेवा केली. सर्वांच्या सुख, दुःखात सहभागी झालो, कधीच हात अखडता घेतला नाही. शंभर एकर जमीन विकून तुमची सेवा केली. लेकीला दोन वेळा आशीर्वाद दिला आहे, यंदा लेकाला आशीर्वाद द्या', असी धनंजय मुंडेंनी भावनिक साद घातली.

'परळीला विचारल्याशिवाय राज्याच्या राजकरणात पानदेखील हलणार नाही'
'राजकीय ताकतीचे काय घेवून बसलात परळी मतदार संघाची ताकद एवढी वाढवू की परळीला विचारल्याशिवाय महाराष्ट्राच्या राजकरणात पानदेखील हलणार नाही',असे म्हणत मुंडेंनी अजित पवारांसमोर परळीकरांना ग्वाही दिली.
'गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न अपूर्ण!'
'परळीच्या इतिहासात पहिल्यांदाच वाण धरण कोरडे पडले आणि माझ्या परळीची दशा झाली. जायकवाडीचे पाणी धरणात यावे ही स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची इच्छा होती, त्यांच्या वारसदारांना गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्ता दिली, मात्र ना जायकवाडीचे पाणी आले, ना वाण धरणाची उंची वाढली. परळीत MIDCसाठी मी प्रयत्न केले मात्र सत्ता असूनही आणि उद्योगपतींशी ओळख असूनही पालकमंत्र्यांना माझ्या भावांसाठी रोजगार निर्माण करता आले नाहीत',  अशा शब्दात मुंडे पालकमंत्र्यांचे अपयश जनतेसमोर मांडले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours