पुणे, 11 सप्टेंबर: आपल्या सहा वर्षांच्या चिमुरडीच्या हाताच्या दोन्ही नसा कापून आईने तिचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेला जाणे टाळण्यासाठी महिलेने हे कृत्य केल्याची माहिती पोलिस चौकशीत उघड झाले आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी आरोपी श्वेता पाटील हिला अटक केली आहे.
मिळालेली माहिती अशी की, पुण्यातील तावरे कॉलनीत सोमवारी (9 सप्टेंबर) दुपारी ही घटना घडली होती. श्वेता पाटील हिने मुलगी अक्षराच्या हाताच्या दोन्ही नसा कापल्या. अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. आरोपी श्वेताचे पती अमित पाटील एका मल्टिनॅशनल सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करतात. पाटील कुटुंब सहा वर्षे अमेरिकेत स्थायिक होते. अक्षराचा जन्मही अमेरिकेतच झाल्यामुळे ती अमेरिकन नागरिक होती. चार वर्षांपूर्वी पाटील दाम्पत्य मुलगी अक्षरासह पुण्यात आलं. अमित पाटील यांना पुन्हा अमेरिकेला जाण्याची संधी आल्यामुळे ते सहकुटुंब व्हिसासाठी चेन्नईला जाणार होते. मात्र श्वेताला अमेरिकेला जाण्याची इच्छा नव्हती.
अमेरिकेला जाणे ती टाळत होती...
पतीच्या अमेरिका वारीच्या निर्णयामुळे श्वेता काही दिवसांपासून अस्वस्थ होती. अमेरिकेला जाणे ती टाळत होती. त्यामुळे मुलीला घेऊन ती तावरे कॉलनीतील नातेवाईकांच्या घरी आली होती. त्यावेळी अमितचे वडील आणि भाऊही त्यांच्या सोबत होते. दोघांनी तिला समजावून मुलीसह गाडीत बसवले.
वॉशरुमला जाण्याचा बहाणा करुन श्वेता अक्षराला घेऊन गाडीतून उतरली आणि पुन्हा घरात गेली. स्वयंपाक घराचे दार लावून तिने सुरीने अक्षराच्या दोन्ही हाताच्या नस कापल्या. यातच अक्षराचा मृत्यू झाला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours