मुंबई, 11 सप्टेंबर : वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय MIM पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी अखेर मंगळवारी (10 सप्टेंबर) स्पष्ट केला. मागील आठवड्यातच प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पक्षाची भूमिका मांडली होती. यावर 'ही भूमिका एकट्या जलील यांची नसून पक्षाची आहे', अशी माहिती असदुद्दीन यांनी पत्रकार परिषदेत मांडली. या घडामोडींवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
'लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्या युतीची जोरदार चर्चा झाली. मात्र आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर 'वंचित'का फुटली, यावर खल होत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधी पक्षनेता कोण हे निवडणुकीआधीच जाहीर केले. ‘या वेळी विरोधी पक्षनेता वंचित बहुजन आघाडीचाच’ असा फटका त्यांनी मारला.  मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेता जाहीर केला. अजून बाजारात तुरी आहेत. तोवर या गमती जमतीचा आनंद घेत राहू', अशी उपहासात्मक टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
काय आहे आजचे सामना संपादकीय?
- आम्हाला आश्चर्य वाटते ते प्रकाश आंबेडकर व मियाँ ओवेसी यांच्या दोस्तान्यात पडलेल्या मिठाच्या खडय़ाचे.
- वंचित बहुजन आघाडीत आता उभी फूट पडली आहे.
-  एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी गेल्याच आठवडय़ात वंचित बहुजन आघाडीबरोबर युती करणार नसल्याचे जाहीर केले होते.
- प्रकाश आंबेडकर मात्र जोपर्यंत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी सांगत नाहीत तोपर्यंत युती कायम आहे, असा खुलासा करीत होते. तथापि आता खुद्द ओवेसी मियाँनीही जलील यांचीच री ओढली आहे. जलील हे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांना महाराष्ट्रबाबत  निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि त्यांचा निर्णय अंतिम असेल असे ओवेसी म्हणाले आहेत.
- एकप्रकारे वंचित आणि एमआयएम यांची युती तुटण्यावर त्यांनी शिक्कामोर्तबच केले आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर पुढे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल.
- लोकसभेत ‘वंचित’ने काँग्रेस-राष्ट्रवादीस जोरदार धक्का दिला, पण विधानसभा निवडणुकीआधी एमआयएम आणि आंबेडकर यांच्या वंचितमध्ये बेबनाव झाला आहे.
- एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी सांगितले, ‘‘आर.एस.एस.वाले आंबेडकरांचे कान भरत आहेत. त्यामुळेच आंबेडकर एमआयएमला झुलवत ठेवत आहेत.’’ जलील यांचे म्हणणे सत्य असेल तर प्रकाश आंबेडकर या वेळी नक्की कुणाची ‘वाजवणार’ हा प्रश्न निर्माण होतोच.
-वंचित आघाडीने ‘बहुजन’ शब्दावर जोर दिला असला तरी त्यास बहुजनांची साथ कितपत राहील? राज्यातील प्रत्येक पक्ष हा बहुजनांच्या नावावरच बेगमी  करीत आहे.
- वंचितांचे दुःख हे कायम कुणाच्या तरी वळचणीलाच आश्रित म्हणून पडून राहिले. म्हणूनच प्रकाश आंबेडकर यांचा ‘स्वबळावर एकला चलो रे’चा नारा महत्त्वाचा वाटतो.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours