सातारा, 10 सप्टेंबर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना धक्कातंत्र देण्याचं काम भाजप-शिवसेनेकडून जोरदार सुरू आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून आउटगोईंग मोठ्या प्रमाणात अजूनही सुरूच आहे. यातच आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचे निकटवर्तीय मानले जाणारे काँग्रेसचे आमदार आनंदराव पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय गोटात सुरू झालीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटल यांची भेट घेतल्यानंतर पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण आलं आहे.
या चर्चांमुळे काँग्रेस पक्षाला पश्चिम महाराष्ट्रात आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आनंदराव पाटील हे काँग्रेसचे विधान परिषदचे आमदार आहेत.  पृथ्वीराज चव्हाणांचे कट्टर विरोधक अतुल भोसले यांच्यासह आनंदराव पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची सोमवारी (9 सप्टेंबर) भेट घेतली. सुमारे 20 मिनिटे ही बैठक सुरू होती. पाटील यांनी भाजप प्रवेश केल्यास चव्हाणांची कराड विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours