रिपोर्टर.. सय्यद जाफरी..
महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षकेत्तर समन्वय समितीचे शासनास साकडे  .लाखनी / भंडारा :- 2005 च्या नंतर शासकीय निमशासकीय सेवेत लागलेल्या कर्मचारी वृंदाना 1982- 84 ची जुनी पेन्शन योजना लागू करावी या जिव्हाळ्याच्या व अन्य मागण्या घेऊन गेल्या7 वर्षांपासून  कधी मोर्चे ,आंदोलने , जलसमर्पण, तर कधी सामूहिक मुंडन तर कधी निदर्शन व निषेध व पाठपुरावा करूनही शासनास जाग आली नाही  त्यामुळे आगामी निवडणुक व आचारसंहिता च्या तोंडावर अख्या महाराष्ट्र राज्यभर समन्वय समितीच्या वतीने 5 सप्टेंबर ला काळ्या फिती लावून निषेध नोंदविला तर 9 सप्टेंबर 2019 ला भंडारा त्रिमूर्ती चौकात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय  सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांचा लाक्षणिक संप आयोजित करण्यात येऊन त्यातून कर्मचाऱ्यांनी शासन विरोधी रोष व्यक्त करीत जुनी पेन्शन लागू करा अन्यथा शासनास  त्यांची जागा दाखवून जुनी पेन्शन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची ,एकच मिशन जुनी पेन्शन , अभि नही तो कभी नही , खुण पशीना लेता है, पेन्शन देना रोता है च्या घोषणा बाजीने अख्ये त्रिमूर्ती चौक भंडारा चे निनादुन गेले होते . महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षकेत्तर समन्वय समिती भंडारा जिल्ह्याच्या वतीने आयोजित एक दिवसीय लाक्षणिक संपात 2005 च्या आधीचे व त्या नंतर चे सर्व विभागातील कर्मचारी एकवटून एक संघ झालेत  यांत जिल्यातील    लाखनी, भंडारा, साकोली, पौनी , लाखांदूर, मोहाडी ,तुमसर या7 ही पंचायत समितीचे  4 हजार 569 कर्मचारी वृंदानीहजेरी लावली असून बहुतांशी महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी "  एकच मिशन जुनी पेन्शन  " हे लाल अक्षरात  लिहिलेल्या शुभ्रकापडी टोप्या वापरून एक संघटनांची शक्ती  सपांच्या माध्यमाने प्रकट करून मागणी मान्य न झाल्यास पुढेही आंदोलन संप तीव्र करण्याचा निर्धार केला. विशेष म्हणजे ग्रामसेवक संपावर असल्याने त्यांचे कामकाज सांभाळण्यासाठी तुर्तास आमच्या मुख्याध्यापक शिक्षक वृंदाच्या नावे  ऑर्डर काढत असल्याने ते रद्द व नाकारण्याचा ही ठाम निर्णय घेऊन तसे जाहीर ही या संपात करण्यात आलेत .सदर संप हा अंशदायी पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना (1982-84 ) ची लागू। करावी. सर्व संवर्गातील वेतन त्रुटी दूर कराव्यात., खाजगीकरण ,कंत्राटीकरन धोरण रद्द करून राज्यातील सर्व कार्यालयात असलेल्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे, केंद्रा प्रमाणे सर्व भत्ते मिळावेत, लिपिक व लेखालीपिकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान पदनाम, समान काम ,समान वेतन व समान पदोन्नती चे टप्पे करावेत, केंद्रप्रमाणे महिला कर्मचार्यांना प्रसूती बालसंगोपन रजा व अन्य सवलती लागू करणे, पदोन्नती व सरळ सेवेने करण्यात येणारी नियुक्ती यामधील प्रारंभिक वेतनातील तफावत दूर करन्यात यावी, राज्यातील सर्व चतुर्थ कर्मचाऱ्यांची होणारी वसुली तात्काळ थांबवून पदोन्नती शैक्षणीक पात्रतेनुसार करावी, अनुकम्पा भरती तात्काळ व विना अट करावी, सर्व कर्मचाऱ्यांची अर्जित रजा साठविण्यासाठी कमाल मर्यादा काढण्यात याविवं रजा0 रोखीकर्णाचा लाभ शिक्षकांनाही मिळावा, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येवू नये व अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांनाही 10 /20/30 आश्वासित प्रगती योजना लागु। करावी शिक्षण व आरोग्य यांचे वर जीडीपी च्या6 टक्के खर्च करण्यात यावा व आरोग्य सेवेचे खासगीकरण वृंद करावे, आरोग्य विभागातील कामाचे तास निश्चित होईपर्यंत वायोमेट्रिक प्रणाली आणू नये.  आदी मागण्याचा अंतर्भाव होता. संपात समन्वय समितीचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनांचे जिल्हा अद्यक्ष मुबारक सैय्यद,अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हा अद्यक्ष रमेश शिंगनजुडे, भंडारा जिल्ह्यमाध्यमिक शिक्षक संघटनेचे ओ. बी. गायधनी, पदवीधरशिक्षक संघटनेचे धंनजय बिरणवार, योगीराज वंजारी, कास्ट्रईब चे घरडे, ग्रामसेवक संघटना चे माकडे,खाजगी माध्यमिक शिक्षक संघटनांचे अंगेश बेलपांडे, सूर्यभान हुमने ,आयटक चे हिवराज उके ह्याशिवाय अनेक विभागाच्या सहभागी समन्वय समितीच्या पदाधिकारी यांनी संपाला संबोधित केलेत बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद देत संप शंभर टक्के यशस्वी केला .



Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours