भंडारा जिल्हा प्रतिनीधी : शमीम आकबानी 
भंडारा -- आराेपी लाेकसेवक विजय मुरारी देशमुख हे सार्वजनिक विभाग भंडारा येथे कार्यकारी अभियंता असतांना यांनी तुमसर जवळील खरबी येथे नविन राईसमिल चे काम करण्याकरिता लागणारे अकृषक जमिनीचे नाहरकत प्रमाणपत्र देण्याकरिता २,५००रुपये लाचेची मागणी तक्रारदाराकडुण केली असता तक्ररदाराने या संबंधाने आराेपीची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नाेंदविली हाेती .सदर प्रकरणात आराेपी विजय देशमुख यांच्या कडुन काेणत्याही प्रकारचा प्रतिकार न करता प्रत्यक्ष सापळा कार्यवाही वेळी दि. २४/३/२०१४ राेजी कार्यकारी अभियंता यांनी सार्वजनिक विभाग भंडारा येथे लाच रक्कम स्विकारल्याने त्यांचे विरुद्ध पाेलीस स्टेशन भंडारा येथे अपराध क्र.३०५७ ।१४ कलम ७,१३ (१) (ड) ,१३,(२) ला.प्र.कायदा १९८८ अनंवये गुन्हा नाेंद करण्यात आला .सदर गुन्ह्याचे तत्कालिन पाेलिस उपअधिक्षक प्रशांत काेलडवार यांनी सदर गुन्ह्याचे दाेषाराेपपत्र तयार करुन मा.न्यायालयात दाखल केले असता सदर खटल्यात अभियाेग चालवुन मा.विशेष न्यायालय भंडारा येथे सदर गुन्ह्यातील साक्षदार यांची पडताळणी करुन आराेपी यास यशस्वि लाच सापळा प्रकरणामधे कलम ७ प्रमाणे ३ वर्षे कारावास व ३०००रुपये दंड ,दंड न भरल्यास ३ महिने अधिकची शिक्षा ठाेठावण्यात आली आहे.
----- जनतेस आव्हाण करण्यात येते कि,काेणी सरकारी नाैकर तसेच जाे शासनाचे मानधन घेवुन काम करताे , सहकारी संस्था ,नगर परिषद,ग्राम पंचायत,जिल्हा परिषद,पंचायत समिती,सदस्य  शासकिय काम करुन देण्याकरिता लाच रक्कम ,अथवा बक्षिस म्हणुन मागणी करित असल्यास मा.पाेलिस उपायुक्त / पाेलिस अधिक्षक ,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ,नागपुर यांचे व्हॉट्सअप क्र. ७०४०२२२२२१ , दुरध्वनी क्र.०७१२/२५६१५२० आणि टाेल फ्रि क्र. १०६४ तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे माेबाईल अँप्स www.acbmaharashtra.net  किंवा facebook.com/maharashtraacb संपर्क या फेसबुक वर सुद्धा तक्रार नाेंदवु शकता
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours