भंडारा अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी सामाजिक मंचच्या वतीने मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन उपमुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना निवासी जिल्हाधिकारी लीना फलके यांच्यामार्फत निवेदन पाठविण्यात आले की सन 2019ते 20 या कालावधित सामाजिक कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मिळावा साठी महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. मात्र कोरोना काळ असल्यामुळे कोणालाही पुरस्कार देण्यात आलेले नाही. म्हणून ज्यांचे प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहेत त्या सर्वच सामाजिक कार्यकर्त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देऊन सन्मानित करावे. कारण कोरोना आजारामुळे महामारी पसरलेली होती. त्यात अनेक कार्यकर्त्यांचे जीव गेले असून काही कार्यकर्ते जिवंत आहेत. शासनाच्या नियोजनाप्रमाणे नुकतेच पोलीस चरित्र प्रमाणपत्राची मागणी केली आहे व सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्ह्याच्या ठिकाणी चारित्र प्रमाणपत्र दिले आहे. यापूर्वी ज्याची शिफारस व ज्याच्या जवळचा मंत्री असेल त्यांनाच पुरस्कार दिले जायचे मात्र या सरकारने तसे करू नये असे निवेदनात नमूद केले .कोरोना सारख्या महामारीवर मात करून जिवंत असलेल्या  सामाजिक कार्यकर्त्यांला पुरस्कार देऊन त्यांचे मनोबल वाढविण्यात यावे अशी मागणी  अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय मंचाचे विदर्भध्यक्ष सुरज परदेशी दीपक वाघमारे लक्ष्मीकात दांडेकर विकास निंबाते, नम्रता बागडे राजकुमार लोणारे , विष्णुदास लोणारे यांनी केले

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours