खोटा आरोप लावून स्वयंपाकी महिलांना कामावरून काढले
आदर्श विद्यालय सिहोरातील प्रकरण
आमरण उपोषणाचा इशारा
सिहोरा वार्ताहर
आदर्श शाळेत विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन तयार करणाऱ्या तीन महिलांना खोटा आरोप लावून कामावरून काढण्यात आल्याच्या प्रकार आदर्श विद्यालय सिहोरा येथे घडला आहे. अन्यायग्रस्त तिन्ही महिलांनी विद्यालयात शाळा प्रशासना विरोधात आमरण उपोषण करण्याच्या निर्णय घेतला आहे. पोषण आहाराचे प्रभारी शिक्षकावर महिलांनी आरोप केले. असून वाद तापण्याची शक्यता आहे. तर महिलांनी केलेले आरोप प्राचार्य अशोक परिहार यांनी फेटाळले आहेत.
तुमसर - बपेरा मार्गावर असणाऱ्या सिहोरा गावातील आदर्श शाळेत स्वयंपाकी की महिला आणि पोषण आहार प्रभारी शिक्षक यांच्यातील वाद अखेर रस्त्यावर आले आहे. आदर्श विद्यालय 5 ते 8 च्या 390 विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यात येत आहे. त्यात स्वयंपाकी सुनिता वघारे, उषा वाघाडे, आणि लक्ष्मी सोनकुसरे या तिन्ही महिलाचा समावेश आहे.15 ते 20 वर्षापासून या तिन्ही महिलां स्वयंपाकी या कामात कार्यरत आहेत. नियमित मध्यान्ह भोजन तयार करीत असताना साहित्य चोरी करीत असल्याची खोटे आरोप या महिलावर लावण्यात आले आहेत. मध्यान्ह भोजन बनवण्यासाठी लागणारे अन्नधान्य, तेल, मीठ, तिखट, आणि भाजीपाला स्वयंपाकी महिलांना कमी देण्यात येत होते. पुरेसे साहित्य उपलब्ध करण्याची मागणी स्वयंपाक की महिला करीत होत्या. परंतु त्यांना मध्यान्ह भोजनाचे साहित्य अपुरे देण्यात आले. ही बाब पोषण आहार प्रभारी शिक्षकाच्या खटकणारी ठरली आहे. अन्यायग्रस्त महिलांनी यासाठी गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे धाव घेऊन अन्याची कैफियत मांडली आहे. परंतु निर्णय घेण्यात आलेला नाही.
🔷 साहित्य चोरी करताना आढळून आल्यानंतर रोशन आहार प्रभारी शिक्षकांनी पोलिसात तक्रार दाखल का नाही केली? आम्ही साहित्य चोरी केलेच नाही साहित्य चोरीचे खोटे आरोप लावून कामावरून काढण्यात आले, या अन्याय विरोधात आमरण उपोषण करणार आहोत.
लक्ष्मी सोनकुसरे स्वयंपाकी महिला
🔷 मध्यान भोजन तयार करण्यासाठी देण्यात येणारे साहित्य चोरी करताना स्वयंपाकी तिन्ही महिला आढळून आलेले आहेत. पोषण आहार प्रभारी शिक्षक आणि अन्य शिक्षकांच्या निदर्शनास चोरीच्या प्रकार आलेला आहे.यामुळे या तिन्ही महिलांना कामावरून काढण्यात आले आहे.स्वयंपाकी महिलांनी केलेले आरोप खोटे आहेत.
प्राचार्य अशोक परीहार आदर्श विद्यालय सिहोरा
🔷 आदर्श विद्यालयात विद्यार्थ्यांना विहिरीच्या पाणी प्यावं लागते.
विद्यालयातर्फे शुद्ध पेजल, RO च्या पाण्याची सुविधा नाही.
धीरज गजभिये वार्ताहर सिहोरा
Post A Comment:
0 comments so far,add yours