*तंटामुक्त समितीचे अध्यक्ष निवडीवरून वाद
*अखेर पोलिसांची मध्यस्थी
तालुका प्रतनिधी,
लाखांदूर तालुक्यातील नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत असलेली चिचाळ/को ग्रामपंचायत येथे दि.२५/०८/२०२३ ला झालेली ग्रामसभा वादडी ठरली त्यामुळे अध्यक्ष यांनी अर्ध्यावरच ग्रामसभा संपल्याचे जाहीर केले.
त्यामुळे जनतेत रोस वाडला असता पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने वाद मिटला.
प्राप्त माहितीनुसार दि २८/०८/२०२३ ला होणाऱ्या ग्रामसभेचे नोटीस दि १७/०८/२०२ जवक क्र.४१३/१८/०८/२०२३ ला जाहीर करण्यात आले त्यात श्री सुरेश तुकडू कुळसुंगे यांच्या अध्यक्षतेखालील आठ विषय घेण्यात आले त्यातील तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष निवडीवरून वाद झाला तंटामुक्त समिती अध्यक्ष पदासाठी तीन नावे समोर आली त्यात कैलाश रामटेके, अल्ताफ हुसेन आणी साधुराम उईके हे तिन्ही अर्ज असताना अध्यक्ष निवडी प्रक्रियवरून वाद झाला व तो विकोपाला पोहचण्या आधीच पोलीस प्रशासनाच्या सावध गिरीने वाद मिटविण्यात आला.
चिचाळ/को येथील आयोजित ग्रामसभेत एकूण आठ विषय पैकी एकही विषय पूर्ण झाला नसून जनतेच्या प्रश्नांचे उत्तर ग्रामसभेत न मिळाल्याने व एकाएकी कोणतेही विषय पूर्ण न होता ग्रामसभा संपल्याचे अध्यक्षांनी जाहीर केल्याने जनतेत रोष वाठल्याचे बोलले जात आहे यात झालेला वाद हाणामारी पर्यंत पोहचल्याने दिघोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पवार साहेबांनी मध्यस्ती करून वाद मिटविला. परंतु आजच्या ग्रामसभेत कोणते ठराव परित झाले किंवा नाही तंटा मुक्त समिती अध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया याबाबद सरपंच, सचिव यांनी जनतेला कोणतीही सूचना दिली नसल्यामुळे आजच्या ग्रामसभे बद्दल जनतेत संभ्रम निर्माण झाले असल्याचे ग्रामवसी बोलत आहेत.
Post A Comment:
0 comments so far,add yours