मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आता पुन्हा एकदा आमने-सामने उभे राहिले आहेत. यावेळी निमित्त आहे कोस्टल रोड प्रकल्पाचं.
शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोडचं भूमीपूजन येत्या रविवारी म्हणजे 16 डिसेंबरला दुपारी 4 वाजता होणार आहे. आणि त्याच दिवशी या कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या कोळी बांधवांची भेट घेण्यासाठी सकाळी 9 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे वरळी इथल्या कोळीवाड्यात जाणार आहे.
या कोस्टल रोडमुळे आपला पारंपरिक मासेमारीचा व्यवसाय कोलमडून पडेल आणि पर्यावरणाचं नुकसान कोळीवाड्यांच्या अस्तित्वालाच नख लागेल अशी तक्रार करत कोळी बांधव राज यांना काही दिवसांपूर्वीच भेटले होते. त्यानंतर राज यांनी स्वत: वरळी कोळीवाड्याला भेट द्यायचा निर्णय घेतला.
कोळी बांधव हेदेखील मराठीच. त्यामुळे त्यांची बाजू घेत आपण मराठी माणसांसोबत आहेत हे दाखविण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. तर मुंबईकरांच्या प्रवास कोंडीवर मार्ग काढत आहोत हे दाखवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्यामुळे मुंबईत रविवार पाॅलिटिकल संडे ठरणार हे निश्चित.
Post A Comment:
0 comments so far,add yours