इचलकरंजी, 23 सप्टेंबर: केंद्रीय निवडणू्क आयोगाने राज्यातील 288 जागांवर निवडणुका जाहीर केल्या आहेत. राज्यात 21 ऑक्टोबर मतदान तर 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. मतदान आणि मतमोजणी यात तीन दिवसाचे अंतर आहे, यावर वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आक्षेप घेतला आहे.
राज्यात एकाच दिवशी मतदान होणार आहे याचे आम्ही स्वागतच करतो. पण मतदान आणि मतमोजणी यांच्यात तीन दिवशांचे अंतर आहे. या तीन दिवसात काहीही गडबड केली जाऊ शकते. यासंदर्भात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करून मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी मतमोजणी करण्याची मागणी करणार असल्याचे आंबेडकरांनी सांगितले.
राजू शेट्टींना स्थान नाही
वंचित आघाडी म्हणजे भाजपची बी-टीम असा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून केला जात आहे. या आरोपाचा आंबेडकरांनी समाचार घेतला. काँग्रेस-राष्ट्रवादीचा हा आरोप म्हणजे चोराच्या उटल्या बोंबा आहेत. या दोन्ही पक्षांच्या नेत्यांवर गुन्हे नोंद झाले आहेत. आमच्यावर आरोप करण्यासाठी त्यांनी सत्ताधाऱ्यांशी सौदा केल्याचा आरोप त्यांनी केला. तसचे बहुजन वंचित आघाडीमध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांना कोणतेही स्थान असणार नसल्याचे तसेच अन्य अपक्ष उमेदवारांना देखील पाठिंबा असणार नसल्याचे आंबेडकरांनी स्पष्ट केले.पण मित्रपक्षांसाठी आम्ही आवश्यक त्या ठिकाणी जागा सोडू असे ते म्हणाले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours