सांगली, 26 सप्टेंबर:  शिवसेना-भाजपचं जागावाटपाचं गणित जुळलं असून युतीची 29 सप्टेंबरला अर्थात घटस्थापनेला घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण शिवसेना स्बळावर लढणार आणि सगळे उमेदवार निवडून आणणार असं शिवसेनेचे नेते दिवाकर रावते म्हणाले आहेत. सागंलीमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यामध्ये ते बोलत होते. शिवसेने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असून आम्ही यावेळी आमचं सामर्थ्य दाखवून देऊ आणि सगळे उमेदवार निवडून आणू असा विश्वास दिवाकर रावते यांनी बोलून दाखवला आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजप 162 जागा तर शिवसेना 126 जागा लढवणार अशी चर्चा एकीकडे सुरू असताना शिवसेनेला जर 144 जागा मिळाल्या नाही तर युती होणार नाही असं खळबळजनक वक्तव्यही दिवाकर रावते यांनी केलं आहे. सांगलीमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या विधामामुळे युतीत आता वेगळ्याच चर्चांना उधाण आलं आहे.
या मेळाव्यादरम्यान, दिवाकर रावते यांनी कार्यकर्त्यांनाही चांगलंच खडसावलं. आपण शिवसेना पक्षातील आहोत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत आपल्याला दक्ष असयला हवं. 11 च्या मेळाव्याला तुम्ही 12 वाजता उपस्थित राहिलात. मेळाव्याला उशिरा उपस्थित राहून मागे बसणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गळ्यात हार घाला असंही रावते म्हणाले.
दरम्यान, विधानसभेत शिवसेना लहान भावाची भूमिका घेणार असल्याची चर्चा आहे. भाजप 162 जागा तर शिवसेना 126 जागा लढवणार आहेत. त्यामुळे जागावाटपात भाजपच मोठा भाऊ ठरला आहे. उर्वरित जागा मित्रपक्षासाठी सोडण्यात येणार आहे. शिवसेना सोडून इतर मित्रपक्ष भाजपच्या 'कमळ' चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours