पुणे, 6 सप्टेंबर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे शिवसेनेत जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, छगन भुजबळ हे राष्ट्रवादीतच राहणार, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे. पुणे महानगरपालिकेत एका कार्यक्रमासाठी आलेल्या सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. छगन भुजबळ शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चेवर पत्रकारांकडून विचारलेल्या प्रश्नावर सुप्रीया सुळे यांनी आपली भूमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागील पंधरा वर्षात संघर्षच केला आहे. या निवडणुकीत संघर्ष करून पुन्हा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही सुप्रिया सुळे यांनी त्यांनी व्यक्त केला.
..हे बाहेरच्या व्यक्तीने सांगण्याची गरज नाही..
सुप्रिया सुळे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. शरद पवार यांनी मागील 50 वर्षांत राज्यासाठी काय केले, अमित शाह महाराष्ट्रात आल्यावर शरद पवार यांच्यावर टीका केली होती. बाहेरच्या व्यक्तीने येऊन शरद पवारांनी काय केले सांगण्याची गरज नाही. राज्यातील जनतेला माहिती आहे की, शरद पवार काय आहेत, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. |
दगाबाजीचे, धोकेबाजीचे पुरावे द्या, सुप्रिया सुळेंचे हर्षवर्धन पाटलांना थेट आव्हान
काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी इंदापूरमध्ये मेळावा घेऊन राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले होते. राष्ट्रवादी धोकेबाज, दगाबाज, विश्वासघातकी आहे असा घणाघाती आरोप करत पवार कुटुंबीयांवर त्यांनी सगळा राग काढला होता. हा राग काढत असतानाच त्यांनी भाजपमध्ये जाण्याचेही संकेत दिले होते. हर्षवर्धन पाटील यांचे हे आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना चांगलेच लागले आहेत. आज पुण्यात त्यांनी पाटील यांना या दगाबाजीचे पुरावे सादर करण्याचं थेट आव्हानच दिले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours