बीड: गेवराई तालुक्यातील नागझरी इथे युवकाची भर दिवसा हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. 20 वर्षीय युवकाची भरदिवसा हत्या करण्यात आल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घरातल्या तरुण मुलाला अशा प्रकार गमावल्यामुळे मृतदेहावर पडून नातेवाईकांनी आक्रोश केला आहे. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. जुन्या वादातून तरुणाची हत्या झाली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय काकासाहेब चव्हाण असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव होतं. काही अज्ञातांनी त्याची हत्या केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. स्थानिकांनी तरुणाला तात्काळ जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. संजयच्या अशा जाण्यामुळे त्याच्या संपूर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे तर परिसरात शोककळा पसरली आहे.
या संपूर्ण प्रकाराची गेवराई पोलिसांना माहिती देण्यात आली पण अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचं सांगण्यात येत आहे. तर संजयचा नेमका खून का झाला याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. नागझरी येथील पारदी वस्तीवर ही घटना घडली आहे. याच ठिकाणी दीड महिन्यापूर्वी अशीच किरकोळ भांडणातून एकाची हत्या केली गेली होती. दोन महिन्यातील ही दुसरी घटना आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours