पुणे, 15 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवासी झालेल्या हर्षवर्धन पाटील यांना जाहीर सभेतच खडेबोल सुनावले आहेत. पुण्यामध्ये झालेल्या जाहीरसभेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी पाटील यांना थेट इशाराच दिला. लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांनी अगदी प्रामाणिकपणे काम केल्याची कबुली खासदार सुळेंनी दिली. मात्र पुढील काळात असं काय घडलं कळलंच नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य करून ते टीका करत राहिले, असंही विधान त्यांनी यावेळेस केलं.
सुप्रिया सुळे, राहुल गांधी आणि हर्षवर्धन पाटील यांची दिल्लीत बैठक झाली असे सांगत पाटलांनी राष्ट्रवादीवर टीका केली. पण आमच्या तिघांची बैठक कधीच झाली नाही, असा गौप्यस्फोटच सुळेंनी केला. पुढे त्या असंही म्हणाल्या की, 'खोटं बोलून टीका करू नका. मला तोंड उघडायला लावू नका नाहीतर तुमच्या अडचणी वाढतील', अशा थेट शब्दांत सुळे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात जाहीरपणे पाटील यांना इशारा दिला. शनिवारी (14 सप्टेंबर)पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात सणसवाडी येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात सुप्रिया सुळे यांनी भाजपासह हर्षवर्धन पाटलांचाही चांगलाच समाचार घेतला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours