नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले अखेर आज घड्याळ काढून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आपल्या अधिकृत फेसबुक आणि ट्विटर अकाउंटवरून उदयनराजे यांनी स्वतः भाजपप्रवेशाची माहिती दिली आहे. 14 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीत भाजपप्रवेश सोहळा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उदयनराजेंनी शुक्रवारी (13 सप्टेंबर) मध्यरात्री आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला.
उदयनराजे भोसले यांचं ट्विट
'आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली, अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील', असं सांगत उदयनराजेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती दिली.
दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी उदयनराजे भोसले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विशेष विमानानं दिल्लीत दाखल झाले आहेत. येथे पोहोचल्यानंत उदयनराजे आणि मुख्यमंत्री रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास अमित शहांच्या निवासस्थानी दाखल झाले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours