नांदेड: राजकारणात कधी कोणाचं नशीब उजळेल हे सांगता येत नाही. नांदेडमध्येही मोहन हंबर्डे हे राजकारणात सक्रिय नसतांनादेखील आमदार झाले. तेही 17 दिवसांत. मोहन हंबर्डे यांना काँग्रेसने दक्षिण नांदेडमधून उमेदवारी दिली आणि ते निवडून आले. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. 4 सप्टेंबरला त्यांनी अर्ज दाखल केला आणि 24 सप्टेंबरला ते आमदार झाले.
मोहन हंबर्डे यांचे सख्खे भाऊ संतुक हंबर्डे हे भाजपाचे महानगराध्यक्ष होते. मागील 5 वर्षांपासून त्यांनी विधानसभेची तयारी केली होती. पण ही जागा शिवसेनेला सुटली आणि संतुक हंबर्डे यांचे आमदार होण्याचे स्वप्न भंगले. मात्र ध्यानीमनी नसतांना मोहन हंबर्डे हे 17 दिवसांत आमदार झाले. दक्षिणमधून काँग्रेसकडे अनेकांनी उमेदवारी मागीतली होती. पण काँग्रेसला नवा चेहरा हवा होता.
हंबर्डे कुटूंबाचा नांदेड ग्रामीणमध्ये बऱ्यापैकी प्रभाव आहे. तेव्हा याच कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देण्याचं काँग्रेसने ठरवलं. मोहन हंबर्डे यांनी निवडणूक लढवन्याचा आग्रह माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला. त्यामुळे मोहन हंबर्डे तयार झाले. काँग्रेससाठी मोहन हंबर्डे नवखे असल्याने ते पराभूत होतील असं वाटत होतं. शिवाय या मतदारसंघात शिवसेनेच्या राजश्री पाटील, एमआयएम, वंचित आणि अपक्ष त्यांचे तगडे आव्हान हंबर्डें पुढे होते. पण त्यांना नांदेडकरांनी साथ दिली. अत्यंत अटीतटीच्या लढाईत मोहन हंबर्डे तीन हजार पाचशे मतांनी विजयी झाले. हंबर्डे यांच्या यशाप्रमाणे अशाच एका उमेदवाराची सध्या सगळीकडे चर्चा आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours