मुंबई, 13 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दहिसरमध्ये येथे सभा सुरू आहे. राज यांनी त्यांनी शिवसेना-भाजप सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. शिवसेना-भाजप होर्डिंगच्या खाली लिहिलंय 'हीच ती वेळ', यावरून राज यांनी टोला लगावला. राज म्हणाले, मग 5 वर्षे वेळ नव्हता का? गेली 5 वर्ष यांना खिशातले राजीनामे बाहेर काढता आले नाहीत. फक्त धमक्या दिल्या. त्या धमक्याही फक्त पैशाचे काम अडले की देतात.
राज ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे...
-देश चालवता येत नाही, म्हणून मोदी सरकारने रिझर्व्ह बँकेकडून 1 लाख 70 हजार कोटी घेतले. हे तुमचे पैसे आहेत. मोदी सरकारने नोटबंदी केली, त्यानंतर 10 दिवसांत मी बोललो होतो की निर्णय चुकला, तर देश खड्ड्यात जाईल. आज 3 कोटी लोकांचे रोजगार गेले आहेत.
-यवतमाळ कशासाठी प्रसिद्ध आहे? तर सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेला जिल्हा. काँग्रेसच्या काळात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या रोखू असं सांगून सत्तेत येणाऱ्या सरकारच्या काळात गेल्या 5 वर्षांत 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आज मुख्यमंत्र्यांची सभा असताना भाजपचा टीशर्ट घालून एका 35 वर्षांच्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली.
-तुमच्या हातात बहुमत असताना उद्योगधंदे बंद का पडत आहेत? पारले जी कंपनीनं सांगितलं 10 हजार लोकं आम्ही काढून टाकणार. प्रत्येकाच्या घरी 4 लोकं म्हटलं, तर त्या 40 हजार लोकांनी करायचं काय?
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours