पुणे, 11 ऑक्टोबर : जागावाटपाचा फॉर्म्युला जुळत नसल्यामुळे युती तुटण्याच्या चर्चा असताना मोठी तडजोड करत अखेर युती झाली. युतीच्या अंतिम फॉर्म्युल्यात भाजप- 144, शिवसेना- 126, तर मित्रपक्ष- 18 अशी जागावाटप झाली. पण युतीत कितीही गोडवा असला तरी शिवसेनेची एक खदखद कधीच मिटणार नाही. गुरुवारी पुण्यात भाजपच्या कार्यालयात मित्रपक्षांसोबत समन्वय बैठक होती. त्या बैठकीत शिवसेनेचा अंतर्गत वाद उफाळून आला आहे. शिवसेनेला पुण्यात एकही जागा दिलेली नाही त्यामुळं खदखद आहे.
पुणे शिवसेना संपर्कप्रमुख बाळा कदम यांचे पीए अतुल राजूरकर यांना सेना युवा कार्यकर्ता किरण साळी यांनी मारहाण केली. तिकीट देतो म्हणून पैसे घेता असा आरोप लावत मारहाण करण्यात आली. त्यामुळे कुठेतरी सेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. यावेळी गिरीश बापट, माधुरी मिसाळदेखील हजर होत्या. अखेर त्यांनी मध्यस्थी करत समजूत घालत सर्वांना शांत केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
खरंतर पुण्यात भाजपने सेनेला एकही जागा न सोडल्याने पक्ष पदाधिकारी सेना भवनाला अक्षरशः कुलूप घालून मातोश्रीवर जाऊन बसले होते. त्यात दुसरीकडे भाजपमध्ये चंद्रकांतदादांपाठोपाठ शिरोळे यांच्या घराणेशाहीलाही विरोध सुरू झाला होता. पुण्यात भाजपने शिवसेनेला एकही जागा न सोडल्याने सेना भवनाला हे असं भलं मोठं टाळं लावण्यात आलं होतं. नाराज पक्ष कार्यकर्ते 'मातोश्री'वर जाऊन बसले होते.
शिवाजीनगरमधून उत्सुक असलेले माजी पोलीस भानू प्रताप बर्गे यांनी तर थेट अपक्षच लढण्याची घोषणा करून टाकली होती. शिवतारे मात्र, या पुणे शहर सेनेच्या या खच्चीकरणाबद्दल सरळ कानावर हात ठेवत आहेत. 2009 साली पुण्यात कोथरूड आणि हडपसरमध्ये सेनेचे आमदार होते. त्यामुळे दोन मतदारसंघातून युतीबाबत तीव्र नाराजी आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours