मुंबई, 13 ऑक्टोबर : मुंबईतील ग्रँट रोड परिसरातील ड्रीमलँड सिनेमाजवळील एका रहिवासी इमारतीला रविवारी सकाळी (13 ऑक्टोबर) आग लागली. शांतिनिकेतन असे इमारतीचे नाव आहे. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास इमारतीत अग्नितांडव घडलं. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं घटनास्थळ गाठत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं कार्य सुरू केलं. आदित्य आर्केड टोपीवाला लेन परिसरातील ही घटना आहे. जवळपास तासाभराच्या बचावकार्यादरम्यान आठ जणांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात आलं. या घटनेत तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवानं या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours