मुंबई, 13 ऑक्टोबर : महाराष्ट्रात आज रविवार सुट्टीच्या दिवशी विधानसभेचा सभांचा महासंग्राम पाहायला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी, गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंह यांसह एक डझनाच्यावर सत्ताधारी आणि विरोधक प्रमुख नेत्यांची राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी विधानसभेसाठी सभा रोड शो होणार आहेत. मुंबईत सकाळीच सात वाजल्यापासून मुख्यमंत्री नरिमन पॉईंट परिसरात मरीन ड्राईव्हवर मॉर्निंग वॉकला आलेल्या लोकांशी संवाद साधत महायुती प्रचार करत आहेत. तर रात्री वर्सोवा इथे मुख्यमंत्री सभादेखील घेणार आहेत.
दुसरीकडे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग गोरेगाव इथे रोड शो तसंच मीरा-भाईंदर परिसरात सभा घेणार आहेत. राहुल गांधी हे मुंबईत दोन सभा घेणार असून चांदिवली धारावी इछे सभा होणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रात आज पहिली सभा होणार असून जळगाव तसंच भंडारा जिल्ह्यातील नाना पटोले यांच्या बालेकिल्ल्यात साकोली विधानसभेत मोदी काय बोलणार आहे याकडे लक्ष आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री यांचे पीए राहिलेले अभिमन्यू पवार औसा विधानसभेत निवडणूक लढवत आहे. नेमक्या याच मतदारसंघात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसचे उमेदवारासाठी प्रचार सभा आयोजित केली आहे.
विदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी नितीन गडकरी सभा घेत आहेत तर मराठवाड्यात यूपीचे मुख्यमंत्री योगी आदिनाथ प्रचारासाठी येणार आहेत. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने देखील प्रचाराचा धडाका लावला आहे. प्रकाश आंबेडकर आज रविवार सुट्टीचा दिवस सादर कळम तुळजापूर करमाळा जामखेड अशा वेगवेगळ्या ठिकाणी पाच पेक्षा जास्त सहभाग घेणार असल्याची माहिती आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापूर शहरातल्या तपोवन मैदानावर सकाळी 11 वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. पावणेदहा वाजता शहा यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन सभास्थळी येणार आहेत. शहा यांच्या सभेसाठी कोल्हापूर भाजपनं जोरदार तयारी केली असून शहरासह जिल्ह्यातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित असणार आहेत. दरम्यान, कोल्हापूरमधील सभा झाल्यानंतर अमित शहा हे हेलिकॉप्टरने कराडला रवाना होणार असून कराड दक्षिणचे उमेदवार अतुल भोसले यांच्यासाठी आणि महायुतीच्या उमेदवारांसाठी कराडमध्ये सभा घेतली जाणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मतदारसंघात शहा नेमकं काय बोलणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागून राहिली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours