मुंबई, 13 ऑक्टोबर: माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या संदर्भात एक मोठा खुलासा समोर आला आहे. पटेल यांचे अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय इकबाल मिर्चीसोबत आर्थिक आणि जमीन व्यवहार झाल्यासंदर्भात ईडी तपास करत आहे. इकबाल फरारी होता आणि त्याचा 2013मध्ये लंडनमध्ये मृत्यू झाला होता. पटेल यांच्या कुटुंबाने प्रमोट केलेली कंपनी आणि मिर्ची या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इकबाल मेमन यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आहे. पटेल यांच्या कुटुंबाकडून प्रमोटेट कंपनी मिलेनियम डेव्हलपर्स प्राव्हेट लिमिडेट आणि मिर्ची कुटुंबात झालेल्या व्यवहाराची चौकशी ईडी करत आहे.
यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पटेल यांच्या कुटुंबाची मालकी असेलल्या कंपनीने मिलेनियम डेव्हलपर्सला मिर्ची कुटुंबाकडून एक प्लॅट देण्यात आला होता. हा प्लॅट नेहरू प्लेनेटेरियमच्या समोर आहे. याच ठिकाणी मिलेनियम डेव्हलपर्सने 15 मजली इमारत उभी केली आहे. त्याचे नाव सीजे हाऊस असे ठेवण्यात आले आहे.
11 ठिकाणी छापे
ईडीने गेल्या दोन आठवड्यात मुंबई ते बेंगळुरूपर्यंत 11 ठिकाणी छापे टाकले आहेत. या ठिकाणी मिळालेल्या काही महत्त्वाच्या कागदपत्रांच्या आधारा ईडीकडून चौकशी सुरू आहे. छाप्यात कागदपत्रांसोबत डिजीटल पुरावे, ई-मेलचा देखील समावेश आहे. यासाठी ईडीने 18 लोकांचा जबाब देखील नोंदवला आहे. ईडीला मिळाला सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे संबंधी जागा पटेल यांच्या कुटुंबाची मालकी असलेल्या कंपनीच्या नावावर होण्याआधी ती जागा इकबाल मेमनची पत्नी हजरा मेमन यांच्या नावावर होती. याच जागेच्या पुनर्निर्मितीसंदर्भात दोघांमध्ये कररा झाला होता. या कराराची कागदपत्रे देखील मिळाली आहेत. 2006-07मध्ये झालेल्या या करारानुसार सीजे हाऊसमध्ये दोन मजले मेमन कुटुंबीयांना देण्यात आली होती. या दोन मजल्यांची किमत 200 कोटींच्या जवळपास आहे. प्रफुल्ल पटेल आणि त्यांची पत्नी मिलेनियम कंपनीत शेअरहोल्डर्स आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यासंदर्भात पटेल कुटुंबीयांना चौकशीसाठी बोलवण्यात येऊ शकते.


ईडीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या लोकांनी हजरा मेमन यांना दोन मजले दिले त्यांच्याकडे विचारणा केली जाऊ शकते. त्याशिवाय या व्यवहारात आणखी काही आर्थिक देवाण-घेवाण झाली आहे का हे देखील विचारले जाऊ शकते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours