मुंबई, 22 ऑक्टोबर : कुख्यात डॉन इक्बाल मिर्चीचा हस्तक हुमायू मर्चंटला सीजे हाऊस प्रकरणी 24 ऑक्टोबरपर्यंत ईडी कस्टडी देण्यात आली. इक्बाल मिर्चीचे कागदपत्र तयार केल्याचा ईडी अधिकाऱ्यांना संशय असून त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेलांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान याप्रकरणी रिंकू देशपांडे नावाच्या महिलेलाही ईडीनं अटक केली आहे.

कुख्यात डॉन इक्बाल मिर्चीचा हस्तक हुमायू मर्चंट अखेर ईडीच्या जाळ्यात अडकलाय. इक्बाल मिर्चीचे बनावट कागदपत्र बनवल्याचा हुमायू मर्चंटवर आरोप आहे. मुंबईतील वरळीच्या सीजे हाऊसमधील संपत्तीचे मुखत्यारपत्र हुमायुच्या ताब्यातून ईडीनं हस्तगत केली आहेत. याच सीजे हाऊस प्रकरणी नुकतेच ईडीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची चौकशी केली आहे.

काय आहे जमीन व्यवहार प्रकरण?

प्रफुल्ल पटेलांची कंपनी आणि इक्बाल मिर्ची उर्फ इक्बाल मेमनमध्ये आर्थिक व्यवहार करण्यात आला. अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्ची आणि मेसर्स मिलेनियमकडून 'सीजे हाऊस'चं बांधकाम करण्यात आलं. करारानुसार 15 मजल्यांच्या इमारतीतील दोन मजले मेमन कुटुंबीयांना देण्यात आले. 2007 मध्ये मिलेनियम डेव्हलपर्सनं बिल्डिंगचे दोन मजले इक्बाल मिर्चीच्या नावे ट्रान्सफर केले

14000 स्क्वेअर फूटांच्या दोन मजल्यांची किंमत 200 कोटींच्या जवळपास आहे. प्रफुल्ल पटेल आणि त्यांची पत्नी मिलेनियम कंपनीत भागीधारक आहेत.

सीजे हाऊस प्रकरणी ईडीनं चौकशीचा फास आवळला आहे. आता हुमायुच्या अटकेमुळं प्रफुल्ल पटेलांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours