मुंबई, 22 ऑक्टोबर : मान्सूनचा पाऊस माघारी गेल्याची बातमी आली, तरी प्रत्यक्षात राज्यातला पाऊस अजूनही थांबलेला नाही. पुणे, मुंबईसह, (Pune rain), (Mumbai rain) कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात ठाण मांडून बसलेला पावसाळा (Mumbai rain) आठवडाभर तरी त्रास देणार, अशी चिन्हं आहेत.
राज्याच्या काही भागात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा (weather alert) देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता कोकण, मध्य महाराष्ट्रात आहे. मराठवाड्याच्या काही भागातही जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो. मुंबई वेधशाळेने 8 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट (orange alert) जारी केला आहे.
का पडतोय अवकाळी पाऊस?
सध्या राज्यात पडत असलेला पाऊस हा बिगरमोसमी पाऊस आहे. अरबी समुद्रात लक्षद्वीपजवळ वाऱ्यांची चक्राकार स्थिती निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यातच ईशान्य मान्सून वाऱ्यांनी दक्षिण भारतात पावसाला सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक भागात आर्द्रता कमी झालेली नाही.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours