मुंबई: मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीमधील वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळल्यानंतर महापालिकेने पोलिसांच्या मदतीने रातोरात सुमारे 700 झाडांवर कुऱ्हाड चालवली. या वृक्षतोडविरोधात पर्यावरण प्रेमी, राजकीय पक्ष चांगलेच आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सर्जिकल स्ट्राइक पद्धतीने आरेच्या जंगलात शिरकाव केला आणि सरकार विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. नंतर पोलिसांनी आमदार आव्हाड यांना ताब्यात घेतले.

मुंबईतील सध्या आरे कॉलनीत कलम 144 अर्थात जमाव बंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे आरे परिसराला छावणीचे स्वरुप आले आहे. एकीकडे पर्यवारण प्रेमींना रोखण्यासाठी मोठ्या संख्येने फौजफाटा आरेच्या चहुबाजूनी लावण्यात आला आहे.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours