मुंबई, 26 ऑक्टोबर: ठाणे-डोंबिवली स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे मध्ये रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे.रुळ दुरूस्त करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरही परिणाम झाला असून लांब पल्ल्यांच्या गाड्या ठाणे आणि दादार स्थानकात रखडल्या.
ऐन दिवाळीत खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठांमध्ये लगबग असते याशिवाय चाकरमनी येत असतात. अशावेळी वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आहे.
पारसिक बोगद्याजवळ रुळाला तडा गेल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची मुंबईच्या दिशेनं येणारी अप जलद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान नागरिक ट्रेनमधून उतरून चालत जात आहेत. ऐन दिवाळीच्या गर्दीमध्ये रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या गाड्यांच्या लांबच लांब रांग पाहायला मिळत आहे. रेल्वे रुळ दुरुस्त करण्याचं काम रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours