मुंबई, 18 ऑक्टोबर : ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल पक्षात एकाकी पडल्याचं चित्र आहे. छगन भुजबळ आणि शरद पवारांसाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. मात्र, या प्रकरणात राष्ट्रवादीनं प्रफुल्ल पटेलांपासून आंतर राखलं आहे.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत  राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल चांगलेच अडचणीत आले आहे. एकीकडे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागलाय तर दुसरीकडं पक्षानंही त्यांना वाऱ्यावर सोडल्याचं चित्र आहे.
खरंतर पटेल यांच्यापूर्वी छगन भुजबळ यांची ईडीनं चौकशी केली गेली. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन केलं होतं. तर नुकतेचं शरद पवारांनी ईडीसमोर हजर होणार असल्याचं जाहीर करताच राज्यभरातील कार्यकर्त्यांनी मुंबईकडे धाव घेतली होती. शुक्रवारी मात्र वेगळं चित्र होतं.
प्रफुल्ल पटेल ईडीसमोर हजर झाले. त्यावेळी एकही कार्यकर्ता त्यांच्यामागे नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसनं या प्रकरणात पटेलांपासून चार हात दूर राहणं पसंत केलं आहे.
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक इक्बाल मिर्ची याच्या पत्नीशी केलेल्या आर्थिक व्यवहार पटेलांच्या चांगलाच अंगाशी आला.
काय आहे जमीन व्यवहार प्रकरण ?
- प्रफुल्ल पटेलांची कंपनी आणि इक्बाल मिर्ची उर्फ इक्बाल मेमनमध्ये आर्थिक व्यवहार करण्यात आला
- अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्ची आणि मेसर्स मिलेनियमकडून 'सीजे हाऊस'चं बांधकाम करण्यात आलं
- करारानुसार 15 मजल्यांच्या इमारतीतील दोन मजले मेमन कुटुंबीयांना देण्यात आले
- 2007 मध्ये मिलेनियम डेव्हलपर्सनं बिल्डिंगचे दोन मजले इक्बाल मिर्चीच्या नावे ट्रान्सफर केले
- 14000 स्क्वेअर फुटांच्या दोन मजल्यांची किंमत 200 कोटींच्या जवळपास आहे
- प्रफुल्ल पटेल आणि त्यांची पत्नी मिलेनियम कंपनीत भागीधारक आहेत
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours