मुंबई, 18 ऑक्टोबर: राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणधुमाळी सुरु असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मंत्रालयात आलेल्या विनावी पत्राने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी याबाबत चौकशी सुरू केली आहे.
मिळालेली माहिती अशी की,मुख्यमंत्री कार्यालयाला शुक्रवारी एक विनावी पत्र मिळाले. या पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीद्वारा आलेल्या पत्रामुळे मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गृहमंत्रालयाने याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. धमकीच्या पत्राने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी नोंद करण्यात आली असून पोलीस धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.
आधीही मिळाली होती धमकी..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधी फेब्रुवारी महिन्यात जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. 'पंकज कुंभार' नामक 'फेसबुक पेज'वरून ही धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी मोठी सतर्कता बाळगून मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ केली होती. साताऱ्यात होणाऱ्या सभेत मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांना टार्गेट करण्यात येणार असल्याचे धमकी देणाऱ्याने म्हटले होते.
Post A Comment:
0 comments so far,add yours