मुंबई 18 ऑक्टोबर : सोमवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदान करताना निवडणूक आयोगाने दिलेलं मतदार छायाचित्र ओळखपत्र आवश्यक आहे. ते नसल्याच कुठलं ओळखपत्र चालेल याची यादी निवडणूक आयोगाने जारी केली आहे. मतदानासाठी देण्यात आलेली छायाचित्र मतदार पावती (मतदारांना मिळणारी स्लिप) ही ओळखपत्राचा पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही, असंही निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
मतदानाचा  हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रामध्ये आपले वैध मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC) सोबत घेऊन जावे. मात्र मतदाराकडे जर वैध मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC) नसेल तर मतदाराने खालील पैकी कोणतेही एक दस्तावेज ओळखपत्र म्हणून मतदार केंद्रावर सादर करावे.
1.    पासपोर्ट (पारपत्र)
2.    वाहन चालक परवाना - Driving Licence
3. छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम,
4.    छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबुक
5.    पॅनकार्ड (PAN card)
6.    राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) अंतर्गत महसूल निर्मिती
निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड
7.    मनरेगा जॉबकार्ड
8.    कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड
9.    छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज
10.    खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र
11.    आधारकार्ड (Aadhar)
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours