सातारा,1 ऑक्टोबर: महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार उदयनराजे भोसले आणि सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे मंगळवारी, 1 ऑक्टोबर रोजी विजय संकल्प रॅलीच्या माध्यमातून निवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
मंगळवारी सकाळी 10 वाजता गांधी मैदान, राजवाडा येथून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जाताना ढोल-ताशाच्या गजरात मिरवणुकीला प्रारंभ होईल. त्यावेळी उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शेखर चरेगावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, विनीत कुबेर तसेच पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, जिल्हा परिषद, सदस्य पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत आदींसह स्थानिक स्वराज संस्था, सहकारी संस्था यांचे सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
गांधी मैदान येथून सकाळी दहा वाजता ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक निघणार असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप सातारा लोकसभा लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक अॅड. भरत पाटील तसेच महायुतीचे पदाधिकारी यांनी केले आहे.
साताऱ्यात यांच्यात रंगणार सामना..
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या तयारी करण्याचे आदेश हायकमांडने दिले आहेत. त्यामुळे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि पृथ्वीराज चव्हाण असाच सामना साताऱ्यात रंगणार आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात नसणार हे आता स्पष्ट झाले आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours