मुंबई, 18 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकांसाठीचं मतदान अगदी 2 दिवसांवर आलं असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बंडखोर तृत्पी सावतं यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे तृत्पी सावंत यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तृप्ती सावंत यांनी वांद्रे पूर्वमधून बंडखोरी करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तृप्ती यांच्या अशा वागण्यामुळे त्यांची सेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
मुंबईच्या वांद्रे पूर्व विभागातून तृप्ती सावंत यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याचं सामानाच्या मुखपत्रातून जाहीर करण्यात आलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून तृप्ती यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं सामनात म्हटलं आहे. दरम्यान, तृप्ती सावंत यांचं तिकीट नाकारून महायुतीच्या विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तृप्ती सावंत यांना तिकीट नाकारल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आणि निकटवर्तीयांमध्ये नाराजीचा सूर होता. तृप्ती सावंत या दिवंगत बाळा सावंत यांच्या पत्नी असून त्या आमदार आहेत. 2015 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये तृप्ती यांनी ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा पराभव केला होता. पण यंदा त्यांना उमेदवारी नाकरण्यात आली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours