मुंबई, 22 मार्च : महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. गेल्या काही तासांमध्ये मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे नवे रुग्ण समोर आले आहे. मुबईत 6 तर पुण्यात 4 असे 10 नवीन रुग्णांचा पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. त्यामुळे राज्यात भीतीचं वातावरण आहे. हे रुग्ण कोण आहेत आणि यांना कोरोनाची लागण कशी झाली याचा आता आरोग्य विभागाकडून तपास सुरू आहे. दरम्यान, आज कोरोनामुळे राज्यात आणखी एक मृत्यू झाला आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी संपूर्ण देशात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. असं असताना महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा आणखी एक मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये कोरोनाचा दुसरा मृत्यू झाला. एका 56 वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यातील हा दुसरा मृत्यू आहे.
महाराष्ट्रामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली असून ती आता 74वर पोहोचली आहे. काही तासांमध्ये हे आकडे वाढले असल्याची माहिती समोर आली आहे. आता संपूर्ण देशात रुग्णांचा आकडा 324वर पोहोचला आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या काही तासांत कोरोनाचे 10 नव रुग्ण समोर आले आहेत. यातील 6 रुग्ण मुंबईतील असून इतर 4 रुग्ण पुण्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours