जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर लोणावळा येथील वरसोली टोल नाक्याच्याजवळ मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या ट्रकने पहाटेच्या सुमारास अचानक पेट घेतल्यामुळे ट्रकला भीषण आग लागली. या दुर्घटनेत ट्रक चालकाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुनील हनवते (वय 30)राहणार तळेगाव दाभाडे असं ट्रकचालकाचं नाव आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे तसंच जुना मुंबई-पुणे महामार्ग या दोन्ही मार्गावर वाहनांना लागलेल्या आगीच्या 2 घटना घडल्या असून एका चालकाचा होरपळून मृत्यू तर दुसरा चालक गंभीर जखमी झाले आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours