पटना, 20 मार्च : निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी अखेर चारही आरोपींना आज फाशी देण्यात आली आहे. फाशी देण्यात आलेल्या चार दोषींमध्ये बिहारमधील औरंगाबादचा रहिवासी अक्षय ठाकूरचा समावेश आहे. अक्षयची पत्नी पुनिता आणि लहान मुलाबरोबर गुरुवारी अखेरची भेट होणार होती. परंतु उशीरा आल्यामुळे तिहार जेल प्रशासनाने भेटण्यासाठी परवानगी दिली नाही. पुनिताने एका वृत्तपत्राला ही माहिती दिली आहे.
इतकंच नाही तर तिला पतीशी शेवटचं काय बोलायचं होतं हे देखील तिने माध्यमांना सांगितलं आहे. ती नवऱ्याला अखेरचं भेटून त्याच्याकडून घटस्फोट मागणार होती. पण तिची भेट झाली नाही आणि कुटुंबियांना भेटण्याची अक्षयची इच्छा अपूर्ण राहिली. ती नवऱ्याला निर्दोष मानते. आता अक्षयच्या शुक्रवारी अखेरच्या अंत्यसंस्कारानंतरच ती बिहारमध्ये परतणार आहे.
यापूर्वी, दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात निर्भया प्रकरणातील दोषींच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान कोर्टाबाहेर हाय व्होल्टेज ड्राम सुरू होता. तेव्हा दोषी अक्षयची पत्नी पुनीता आणि स्वत: च्या लहान मुलालाही फाशी देण्याची मागणी करत होती. तिने स्वत:ला सँडिलने मारहाण केली आणि बेशुद्ध पडली. ती म्हणाली की समाज तिच्या सभ्य पतीच्या मागे लागला आहे.
निर्भयाच्या चारही आरोपींचा शेवटचा अर्धा तास
चारही दोषींना 20 मार्च 2020 रोजी पहाटे 5.30 वाजता फाशी दिली गेली. फाशी देण्यापूर्वी अर्धा तास हे खूप महत्वाचे होते. यावेळी दोषींनी स्वत: चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. ते ओरडले, उशीरापर्यंत हँगिंग रुममध्ये बसले होते. पण शेवटी संपूर्ण देश त्यांच्या मृत्यूची वाट पाहत होता.
चौघांनाही एकत्र दिली फाशी
जेल अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, चारही आरोपींना एकत्र फाशी देण्यात आली. यासाठी तुरूंग क्रमांक -3 च्या फाशी सेलमध्ये चौघांना फासावर लटकवलं. चारहींना फाशी देण्यासाठी 60 हजार रुपये फाशीची शिक्षा निश्चित करण्यात आली होती, ही किम्मत फक्त फाशी देणाऱ्यालाच मिळेल.
Post A Comment:
0 comments so far,add yours