नागपूर: कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रात प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे राज्य सरकारने खबरदारीचे उपाय ठिकठिकाणी बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. आज खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूरमध्ये दुकानं, हॉटेल्सवर छापा टाकला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं हॉटेल्स बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, तरीही शहरातील काही हॉटेल्स सुरू होते. याबद्दल नागरिकांनी तक्रार केल्यानंतर खुद्द गृहमंत्र्यांनी शहरातील हॉटेल्स आणि दुकानावर छापे टाकले. शहरातील बर्डी भागातील दुकानांमध्ये धाडी टाकल्या. काही मेडिकल स्टोर्समध्येही कारवाई करण्यात आली. अनिल देशमुख यांनी हल्दीराम हॉटेल्सवर छापा टाकला. यावेळी अनिल देशमुख यांनी हल्दीराममधील बिलं ताब्यात घेतली. त्यानंतर बजाजनगर भागातील सुजल सावजी हॉटेल्सवर छापा टाकला. यावेळी छाप्यात चिकन, मटणने भरलेले मोठाले पातले आढळून आले. हॉटेल्स बंद करण्याचे आदेश असतानाही सुरू ठेवल्यामुळे देशमुख यांनी संबंधित हॉटेल्सवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.
राज्यात रुग्णांची संख्या 49 वर
दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. रुग्णांची संख्या 49 वर पोहोचली आहे. तर देशात कोरोना रुग्णांची संख्या 166 झाली आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार उपाययोजना करत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळा, एकाच ठिकाणी जास्त गर्दी करू नये, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.
कोरोनाला रोखण्यााठी सरकारने केले मोठे बदल
1. राज्यातील शासकीय कार्यालये एक दिवसाआड पद्धतीने रोज 50 टक्के कर्मचारी येतील या हिशोबाने सुरू ठेवण्यात येतील.
2. रेल्वे, एसटी बसेस, खाजगी बसेस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही 50 टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours