पुणे 15 एप्रिल: पुण्यात कोरोनाची व्याप्ती वाढत आहे. आज नव्या 51 रुग्णांची भर पडली. तर 4 जणांचा मृत्यू झाला. वानवडी, हडपसर, मुंढवा आणि कोंढवा या पोलीस परिमंडळातील आणखी परिसर सील करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्याचा आता मोठा भाग सील झालाय. विभागातील 68 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे विभागातील एकूण रुग्ण संख्या 472 वर गेली आहे. आज ज्यांचा मृत्यू झाला त्यात एका 34 वर्षांच्या युवकाचाही समावेश आहे. त्याचा ससूनमध्ये मृत्यू झाला.
अशी आहे जिल्ह्यांची स्थिती
पुणे 427
सांगली 26
सातारा 11
सोलापूर 2
कोल्हापूर 6
तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना साद आणखी अडचणीत, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
देशात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. दररोज रुग्णांचा आकडा वाढत आहे. देशात आत्तापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 11,933वर गेली आहे. तर 392 जणांचा मृत्यू झालाय. 1344 जण बरे झाले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 1 हजार 118 नवीन प्रकरणे तर 24 तासांत 39 जणांचा मृत्यू झाला. चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर जगातल्या ज्या मोजक्या देशांनी उपाय योजना सुरू केली त्यात भारताचा समावेश होता असा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केला आहे.
ते म्हणाले, चीनमध्ये 7जानेवारीला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर 8 जानेवारीला आम्ही तज्ज्ञांची बैठक घेऊन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आणि उपाय योजनांना सुरुवात केली असा दावाही त्यांनी केला आहे.
कोरोना व्हायरसच्या आव्हानाविरुद्ध लढण्यासाठी सरकारी पातळीवरून शक्य तितक्या सर्व पर्यायांचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आधी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. या लॉकडाऊनच्या कालावधीत आता वाढही करण्यात आली आहे. त्यानंतर आता मोदी सरकारने त्रिस्तरीय यंत्रणा तयार केली आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours