मुंबई 15 एप्रिल: लॉकडाऊनच्या काळात राज्यातली सामाजिक परिस्थिती आणि शांतात बिघडविण्याचा प्रयत्न होत आहे. काही समाजकंटक सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्लूप्त्या करून सामाजिक तेढ निर्माण करत असल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांच्या सायबर विभागाने केला आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्यासाठी धार्मिक मुद्यांचा वापर केला जात आहे. नागरिकांनी अशा खोट्या गोष्टींना बळी पडू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

अशा प्रकरणांमध्ये आत्तापर्यंत 35 लोकांना अटक करण्यात आली आहे तर 114 जणांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आलंय. सर्व राज्यात अफवा पसरविण्याच्या 201 प्रकरणांची नोंद करण्यात आल्याची माहितीही पोलिसांनी दिलीय.

Whatsapp संबंधात 99 Facebookबाबत 66 तर Tik-Tokवरून आक्षेपार्ह व्हिडीओ डाऊनलोड केल्याप्रकरणी 3 तर इतर माध्यमांचा वापर केल्याप्रकरणी 37 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खोट्या बातम्या तयार करणं, त्या पसरवणं, आक्षेपार्ह लिखान करणं, प्रक्षोभक व्हिडीओ व्हायरल करणं असे गुन्हे दाखल करण्यात आले आहे अशी माहिती पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली आहे.

मुंबईतील वांद्रे स्टेशनबाहेर 'त्या' हजारोंच्या जमावाबाबत BMC ने केला मोठा खुलासा
तर मंगळवारी केलेल्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत इशारा दिला होता. काही लोक आग भडकविण्याचा आणि त्यात तेल टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांनी तेढ निर्माण करण्याचे उद्योग बंद करावेत नाहीतर अशा लोकांना पोलीस सोडणार नाहीत अशा इशारा त्यांनी दिला होता. वांद्रे प्रकरणानंतर पोलीस अधिक दक्षता घेत असून सोशल मीडियावर पोलिस बारीक लक्ष ठेवत आहेत.

पुण्यात आज 51 पॉझिटिव्ह रुग्णांची भर, शहराचा आणखी मोठा भाग केला सील
राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. राज्यात आज 232 रुग्णांची भर पडली तर 9 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 2916 झाली असून 187 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 52000 तपासणी झाल्या असून त्यातील 48 हजार 198 तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सगळ्यात जास्त रुग्ण हे मुंबई आणि ठाण्यात आहेत. राज्यात 5 हजार 394 सर्व्हेक्षण पथकं काम करत असून त्यांनी आत्तापर्यंत 20 लाख लोकांचा सर्व्हे केल्याची माहितीही देण्यात आली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours