मुंबई, 27 एप्रिल : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आलं आहे. त्यामुळे परप्रांतीय मजूर राज्यात अडकून पडली आहे. या मजुरांना घरी जाण्याची घाई आहे, पण घरी जाऊन खाणार काय? असा सवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थितीत केला होता. त्यांच्या या प्रश्नाची री ओढत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
सामनामध्ये  'जाणार! जाणार!! जाणार!!! पण जाऊन काय खाणार?' या शिर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखात आजही राजकारण करणाऱ्या नेत्यांनी फटकारून काढण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांचे आभार माणून राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांना टोला लगावला होता. आजच्या 'सामना'मध्येही गडकरींच्या प्रश्नावरून परप्रांतीयांना गावी सोडण्याचा आग्रह करणाऱ्या भाजप नेत्यांनी खडेबोल सुनावण्यात आले आहे.
काय लिहिलंय सामनात?
परप्रांतीयांना बाहेर पडायची आणि महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून घरी पोहोचायची घाई झाली आहे. अर्थात, त्यांना बाहेर पडू न देणे हे आरोग्याच्यादृष्टीने सोयीचे आहे, पण त्यांचे काफिले झुंडीच्या झुंडीने निघणारच असतील तर केंद्र सरकारला अशा लोकांची जबाबदारी झटकता येणार नाही. गाड्या सोडा, बसेस लावा, पण त्यांची जाण्याची व्यवस्था करा. कारण या मंडळींचा ‘होमसिक’नेस संपला नाही तर हे सर्व लोक रस्त्यावर उतरून काय हैदोस घालतील याचा नेम नाही. त्यांना त्यांच्या राज्यात घेऊन चला, पण गडकरी म्हणतात त्या प्रश्नाचे उत्तरही शोधा. ‘भावांनो, गावी जाऊन खाणार काय?”  या प्रश्नाचे उत्तर आंध्र प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीसुद्धा द्यायचे आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours