बीड, 27 एप्रिल : महाराष्ट्रापुढे कोरोनाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. अशातच बीडमध्ये कोरोनाच्या संकटात आणखी नवी भर पडली आहे. जिल्ह्यातील हजारो मुक्या जनावरांना नवीन आजाराची लागण झाली आहे.
संपूर्ण जिल्ह्यात शेतकरी या नव्या आजारामुळे हवालदील झाला आहे.  गाय,म्हैस, बैल,यांच्या अंगावर फोंड, घशाला तोंडाला सूज आणि ताप आल्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहे.  बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई,परळी तालुक्यातील शेकडो गुरांना या आजाराची लागण झाली असून आतापर्यंत काही जणांचा मृत्यू झाला आहे.
परळी तालुक्यातील पिंपळगाव शिवारात 10 गावात या आजाराचा जास्त प्रमाणात प्रभाव आढळून आला आहे. या आजारावर तोडगा काढण्यासाठी  पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही हात टेकले आहे. या आजारावर कोणतेही निदान होत नाही. त्यामुळे हा आजार एखादा व्हायरस असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
हा आजार देवीच्या साथीचा विषाणू असल्याचा अंदाज पशुतज्ञांनी व्यक्त केला आहे. परंतु, यावर अद्याप कोणताही इलाज सापडलेला नाही.
या  साथीच्या रोगामुळे लाख मोलाची जनावरं मरण्याच्या मार्गावर उभी आहे. उपचार मिळू न शकल्यामुळे शेतकऱ्यांना डोळ्या देखत जनावरांना तडफत पाहावे लागत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours