विद्युत विभागाच्या अलगर्जीपणामुळे भगतसिंग वार्डातील नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे .भंडारा भगतसिंग वार्डातील नवीन टाकळी येथे विद्युत उपकेंद्र आहे या उपकेंद्राच्या माध्यमातून वार्डातील नागरिकांना विद्युत पुरवठा करण्यात येत असून तक्रारीचे निवारण केले जाते. गेल्या काही महिन्यांपूर्वी वार्डातील जुने विद्युत पोल काढून नवे विद्युत पोल बसविण्यात आले. या विद्युत  तारा बरोबर कसण्यात आल्या नसून तारा लोंबकळत आहेत. त्यामुळे सतत विद्युत पुरवठा खंडित होत आहे अनेक नागरिकांच्या घरचे विद्युत उपक्रम जळल्या गेल्यात उदाहरण टीव्ही ,लाईट ,फ्रिज, विद्युत मीटर जळले आहेत .या घटनेची तक्रार विद्युत विभागाला करण्यासाठी ऑफिसातील फोनवर फोन लावले असता फोन उचलण्यात येत नाही कधीकधी फोन बाजूला ठेवण्यात येत आहे. आज दिनांक ३/४/२०२० रोजी अंदाजे नऊ वाजता विद्युत विभागाचा हलगर्जीपणा मुळे विद्युत पुरवठा खंडित झाला त्यात २३-२५ व्यक्तीच्या घरची टीव्ही व काही विद्युत उपकरणे जळली आहेत .याबाबत संबंधित अधिकाऱ्याची फोनवर चर्चा केली असता ते उडवाउडवीचे उत्तर देत होते .कोरोना आजाराच्या महामारी असल्यामुळे  सर्व नागरिक आपल्या घरात असून MSEB मुळे हा मोठा फटका पडला आहे .त्याच्याकडे शासनाने व प्रशासनाने तात्काळ  लक्ष द्यावी व झालेल्या नुकसानीची भरपाई संबंधितांनी अधिकाऱ्यांच्या पगारातून कपात करून देण्यात यावी अशी मागणी भंडारा शहरातील भगतसिंग वारडातील नागरिकांची आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours