• परराज्यातील स्थलांतरीतांची संख्या सर्वाधिक
• जेवणासह निवासाची व्यवस्था
• पण गावाकडची ओढ स्वस्थ्य बसू देईना
जिल्हा प्रतिनिधि शमीम आकबानी
भंडारा,दि.3 :- कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन केल्याने दारोदार फिरुन झाडू विक्री करणाऱ्या 34 कुटुंबाची भटकंती भंडारा जिल्हा प्रशासनाने थांबवली आहे. ईतकेच नव्हे तर त्यांना दोन वेळच्या जेवणासह निवासाची उत्तम व्यवस्था केल्याने, सध्यातरी आम्हाला कशाचीच चिंता नाही, अशी आश्वस्थ भावना भंडारा शहरातील मुलींच्या वसतीगृहातील आश्रीत बेघर फिरस्त्या झाडू विक्रेत्या नागरीकांनी व्याक्त केली आहे. गावाची ओढ असली तरी आजाराचा धोका पाहता आम्ही प्रशासनाच्या सुचनांचेच पालन करु असे अनेकांनी सांगितले.
लॉक डाऊनमुळे अन्य राज्यातून कामगार मोठ्या प्रमाणावर स्थलांतरीत होत आहेत. दरवर्षी गुढीपाढव्याच्या मूहुर्तावर अनेकजण ग्रामीण भागात नवीन झाडू खरेदी करीत असल्याने गेल्या तीस वर्षापासून अविरत तीन महिण्यांसाठी छत्तीसगढ़ येथील अनेकजण भंडारा जिल्ह्यात दाखल होतात. झाडू विक्री व्यवसायाच्या निमित्ताने ते राज्यभर फिरतात. याच व्यवसायावर त्यांची उपजिविका आहे. छत्तीसगढ़ राज्यातील महासुमन जिल्हयातील बेसोंडा येथील रहिवासी गजाबाई पारधी, दिलिपकुमार पारधी, नारायण पारधी, सुरजाबाई पारधी, राजकुमार पारधी, संतोष पारधी, नकुल पारधी, करण ठाकुर यांच्यासह 54 नागरिक आपल्या कुटुंबियांना घेऊन व्यसायासाठी पंधरा दिवसांपूर्वी शहरात आले होते.
मात्र पुढे काय घडेल याची यापैकी कोणालाच कल्पना नव्हती. तंबु उभारल्यावर तिसऱ्याच दिवशी म्हणजे 25 मार्च रोजी झालेल्या लॉक डाऊनमुळे पायाखालची जमीनच सरकली. बंदीमुळे कुठेही फिरता येणार नाही, उपजिविकेचा व्यवसाय करता येणार नाही ही जाणिव झाली. आले तेव्हा प्रत्येक कुटुंबियांकडे जेमतेम 10-20 किलो धान्य होते. एवढ्यात महिना कसा काढणार ही चिंता,तर जेमतेम पैसेच गाठीला. आता करायचे काय अशा विचारातच आठ दिवस उलटले, तोच पोलीसांनी येऊन संचारबंदी लागू झाल्याचे सांगितले. असे रस्त्याच्याकडेला राहता येणार नाही आपली व्यवस्था निवारागृहात केल्याचे सांगून आम्हाला भंडारा येथील मुलींच्या वसतीगृहात आणून सोडले.
या ठिकाणी आलो ते फक्त अंगावरील कपड्यानिशीच. बाकी संसार तर आजही तिथेच रस्त्याच्याकडेला पाल ठोकलयं तिथेच आहे. निवारागृहात आम्हाला कशाचीच चिंता नाही, पण साहेब माझी लेकर गावाकडे आहेत दररोज फोन करतात ‘हरदिन पूछते है’ माँ आप कब आओगी’ असे सांगतानाच सुरजाबाई पारधी यांना आश्रू अनावर होतात. आपल्या भावना व्यक्त करतांनाच ‘साहेब कुछ भी करो, हमे घर भेजने का इंतजाम करो बहुत उपकार हो जाएंगे’ असे आर्जव पण करतात.
यातही काहीजण सुजान आणि दक्ष असल्याचे दिसले. ईथे आमची सरकारी अधिकारी व जिल्हा प्रशासनाने खूप चांगली व्यवस्था केली आहे. दोन वेळच्या जेवणासह निवासाची उत्तम सोय आहे. चहा, नाष्टा तसेच आरोग्य तपासणी वारंवार केली जात असल्याचे अनेकांनी सांगितले. त्यामुळे आम्ही ईथेच सुरक्षित आहे, गावाकडची ओढ असली तरी जातानाही मोठा धोका असणार आहे. प्रशासन सांगेल तोपर्यत ईथेच थांबण्याचा आम्हचा निर्णय आहे. आम्हाला आम्हाला कुढलाही त्रास नाही. कोरोनाबाबत प्रशासनाच्या वतीने योग्य सूचनासह मार्गदर्शन केल्याजाते अशा भावना अनेक विस्थापितांनी व्यक्त केल्या.
जिल्हयातील भंडारा शहरातील 4 वसतीगृहात तर लाखनी 2 ठिकाणी, तर साकोली, लाखांदूर, पवनी, तुमसर या ठिकाणी बेघरांची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. आतापर्यत मुलींच्या वसतीगृहातील 27 मार्चपासून 3 एप्रिलपर्यत सुमारे 334 जणांची येथे उत्तम व्यवस्था केल्याने अनेक निराधारांनी सद्यस्थितीत सुटकेचा निश्वास सोडला आहे. 14 एप्रिलपर्यंत लॉक डाऊन असला तरीही विविध जिल्हयातील, महानगरातून कामाच्या निमित्ताने गेलेले कामगार, मजूर पायी चालत तर कुणी ट्रक, टेम्पोचा आधार घेत आपल्या गावाकडे परततांना दिसत आहेत.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता अशा व्यक्तींना पुढे जावू देणे धोक्याचे आहे, हे ओळखून जिल्हा प्रशासन त्यांची व्यवस्था निवारागृहात करत आहे. निवारागृहातील व्यवस्था व आपले पण पाहूण कामगार, स्थलांतरीत नागरिक भाराऊन जात आहे.गावाकडची ओढ असली तरी राहण्या जेवनाची उत्तम व्यवस्था व आपलेपणामुळे कोरोनाचा धोका टळेपर्यंत आम्ही इथेच राहणार असल्याचा निर्धार नागरिक व्यक्त करतात.
Post A Comment:
0 comments so far,add yours