परदेशी संपादक
भंडारा :- १८ ते २० ऑक्टोबर २०२४ रोजी घेण्यात येणाऱ्या ३५ वी ज्युनिअर राज्यस्तरीय आट्यापाट्या चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन शेगाव ( बुलढाणा) येथे करण्यात आले आहे. जिल्हा संघ निवड चाचणी स्थानिक लॉडर्स पब्लीक स्कुलच्या भव्य पटांगणावर १३ ऑक्टोबर रोजी घेण्यात आली. जिल्हा संघात त्यात मुलांचा संघ समीर झंझाड (कर्णधार ), आदित्य कनोजे (उपकर्णधार), आयुष मानापूरे, भारत निनावे, सुशिल चोपकर, सोहम कुथे, सोनु काळे, निपुर नेरकर, संस्कार केजरकर, पवन भुरे, कृणाल केजरकर, वंश बोपचे, प्रशिक्षक शिवशंकर नागपुरे, व्यवस्थापक म्हणून आयर्न मरसकोल्हे तसेच मुलींच्या संघात मुस्कान अग्रवाल कर्णधार, संचिता आस्वले (उपकर्णधार), रुपाली कनोजे, स्वराली साकुरे, प्राप्ती धुर्वे, अक्षरा उईके, श्वेता मुळे, अन्नु तुमसरे, छाया बरब रैय्या, समीश्रा आस्वले, आर्या उजवने, आचल ब्राम्हणकर प्रशिक्षक म्हणून भारतीय टीमची कर्णधार प्राची चटप, व्यवस्थापक अश्वीनी साठवणे यांचा समावेश आहे.
खेळाडूनी आपल्या निवडीचे श्रेय संस्था अध्यक्ष राजेश धुर्वे, संस्था सचिव श्याम देशमुख, आटयापाट्या खेळातील सर्व अवार्ड प्राप्त खेळाडू तसेच आजी- माजी खेळाडू व आपल्या आई- वडील यांना दिले आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours